(रत्नागिरी)
रत्नागिरीतील प्राण्यांचे डॉक्टर अविनाश भागवत यांनी २ मुलींशी असभ्य वर्तन केल्याची तक्रार काल रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात मुलींनी केली होती. त्यानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता वेगळच प्रकरण समोर आले आहे. रिसेप्शनिस्ट असलेल्या २ मुलीनी आपल्याला ४ लाखाला चुना लावल्याची तक्रार डॉक्टर भागवत यांनी या शहर पोलीस स्थानकात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका बबन गिजे (२६, मारुती मंदिर, रत्नागिरी), दिशा दिनेश सुर्वे (२८, रा. शांतीनगर रसाळवाडी) या दोन तरुणी डॉक्टर भागवत यांच्या प्राण्यांच्या दवाखान्यात रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होत्या. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत रेणुका गीजे व दिशा सुर्वे या दोघीनी स्वतःच्या नावे गुगल पे अकाऊंट तयार केले होते. या अकाऊंटचा वापर करून दोघींनी डॉक्टरकडे येणाऱ्या ग्राहकांचे पैसे स्वतःच्या नावाने स्वीकारले. अशाप्रकारे या दोघींनी ४ लाख १२ हजार रुपयांना आपली फसवणूक केल्याची तक्रार डॉ. भागवत यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघींविरूद्ध भादवि कलम ३८१ , ४०६ , ४०८ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली.