(खेड)
बंद घरात प्रवेश करून चोरट्यांनी चक्क घरगुती वस्तूंवरच डल्ला मारत ६६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना कर्जी (ता. खेड येथे घडली. हा प्रकार रविवारी (३८ डिसेंबर) रोजी समोर आला. या प्रकरणी खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीप्रकरणी फैयाज ऊ. चौगुले (रा. कर्जी ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार कर्जी येथील त्यांचे घर दि. २२ मे ते दि ३१ डिसेंबर, २०२३ या कालावधीत बंद होते. घराच्या पाठीमागील खिडकीच लोखंडी गज चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर, ४० किलो – वजनाच्या दोन डेगी, जेवणाची २० ताटे – २ हंडे, ३ कळशा, पाण्याची छोर्ट – टाकी, एक गॅस शेगडी व दोन स्पीक – या गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याची किंमत ६६ हजार रुपये इतकी आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत