(हैदराबाद)
क्युबाचे क्रांतिकारक चे गुवेरा यांच्या निधनाच्या जयंतीनिमित्त आगामी त्याच्या जीवनावरील ‘चे’ या चित्रपटाच्या टीझरचे अनावरण त्यांच्या मृत्यूदिनीच करण्यात आले. चे गुवेरा यांच्या जीवनावरील भारतात तयार झालेला हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाची “लाँग लिव्ह” अशी टॅगलाईन आहे.
नव उदयम प्रस्तुत नेचर आर्ट्स बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शितही करण्यात आले आहे. या चित्रपटात बी. आर. सबावत नाईक चे यांची मुख्य भूमिका साकारत आहेत. ते या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहेत. या चित्रपटात लावण्य समीरा, पुला सिद्धेश्वर, कार्तिक नुने, विनोद आणि पासला उमा महेश्वर यांच्यासह अनेक प्रतिभावान कलाकार भूमिका साकारत आहेत. सूर्या, बाबू आणि देवेंद्र यांची निर्मिती असून, तर संगीत रविशंकर यांचे आहे. चित्रपटाने पोस्ट-प्रॉडक्शन पूर्ण झाले असून लवकरच सेन्सॉर प्रमाणपत्र घेतले जाणार आहे
या चित्रपटाच्या पहिल्या लुकच्या अनावरण सोहळ्याला चे गुवेरा यांची कन्या डॉ. अलैदा गुवेरा याही उपस्थित होत्या. या चित्रपटाविषयी बोलताना, बी. आर. सबावत नाईक म्हणाले, “आम्हाला क्रांतिकारी नायक आणि तरुणांची प्रेरणा असलेल्या चे गुवेरा यांची कहाणी पडद्यावर जिवंत केल्याबद्दल खूप अभिमान वाटतो. आम्ही अत्यंत कष्टाने त्यांचे संघर्ष आणि बलिदान चित्रपटात मांडले आहे. त्यांच्या युगाचे प्रामाणिक चित्रण केले आहे.