(ज्ञान भांडार)
दान ही गोष्ट प्रत्येक धर्मामध्ये श्रेष्ठ मानली जाते. दान केल्याने आपल्या कार्यातील प्रत्येक अडथळा दूर होतो. दान करणे हे एक मानवतेचे प्रतीक देखील आहे. असे म्हटले आहे की- सत्ययुगातील तप, त्रेतामधील ज्ञान, द्वापरातील यज्ञ आणि कलियुगातील दान यानेच मनुष्याचे कल्याण होऊ शकते. मात्र दान करण्याचेही काही नियम पद्धती आहेत.
दान नेहमी भक्तिभावाने व नम्रतेने करावे. तसेच, देणगी शक्य तितकी गुप्त ठेवा. गुप्त दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. दान केल्यानंतर कोणत्याही प्रकारची अपेक्षा करू नये. याशिवाय अशा काही गोष्टी आहेत, ज्या दान करणे टाळावे. महान नीती तज्ञ चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आढळतो.
या सात वस्तू दान करणे मानले जाते वर्ज
1. शक्यतो स्टीलची भांडी दान करू नये. विशेषत: जी भांडी तुमच्या घरात ठेवली आहेत, त्यांचे दान टाळावे. याचा वाईट परिणाम कुटुंबाच्या सुख-समृद्धीवर होऊ शकतो.
2. ताजे अन्न आणि पाणी महादान मानले जाते. त्यामुळे गरजू आणि गरिबांना ताजे अन्नदान आणि अन्नधान्य दान करा. शिळे अन्न कोणालाही दान म्हणून देऊ नका.
3. पुस्तके, ग्रंथ इत्यादी गरजूंना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण या गोष्टी फाटलेल्या असू नयेत. तुम्ही एकतर विद्यार्थ्याला नवीन प्रती आणि पुस्तके दान करा किंवा पुस्तके नीट दुरुस्त करून दान करा, जेणेकरून ती एखाद्याला उपयोगी पडतील. तसेच चाणक्य सांगतात की, आपण वापरलेले, फाटके कपडेही कोणाला दान म्हणून देऊ नयेत.
4. लोक अनेकदा शनिवारी तेल दान करतात. पण हे तेल शुद्ध असले पाहिजे. म्हणजेच, आपण आधीच वापरले तेल दान करु नये.
5. प्लास्टिकच्या वस्तू दान करणे देखील टाळावे. प्लास्टिकच्या दानाचा आपल्या व्यवसायावर परिणाम होतो, असे मानले जाते. याशिवाय चाकू, कात्री, तलवार इत्यादी धारदार वस्तू दान केल्याने कुटुंबातील सुख-शांती भंग पावते. त्यामुळे कोणतीही तीक्ष्ण वस्तू दान करू नयेत
6. झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. यामुळे घरातील गरिबी दूर होते, त्यामुळे घरातील झाडू कोणालाही दान करू नये. ज्योतिष्यांच्या मते, झाडू दान केल्याने आर्थिक नुकसान होते.
7. भगवान श्रीकृष्ण आपल्या कृष्ण वाणी मध्ये सांगतात की, जी व्यक्ती आपल्या हातातील वापरत असलेले घड्याळ कोणाला देत असतील तर त्या सोबत तुमचा चांगला काळ देखील त्या व्यक्तीकडे जातो. यामुळे आपल्या हातात घातलेलं घड्याळ कुणालाही देऊ नका. असं करून आपण आपल्या भाग्यातील सुखाच्या गोष्टी दुसऱ्याला देत असतो.
( टिप – वरील माहिती प्रचलित ज्ञान व सामाजिक मान्यता यावर आधारित आहे)