(रत्नागिरी)
संगमेश्वर तालुक्यातील एका गावातील 10 वर्षीय मुलीशी गैरप्रकार करणाऱ्या नराधम वृद्धाला न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावास व 4 हजार 500 रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी आहे. जीवा उर्फ रोंग्या गंगाराम जाधव (66, ऱा आरवली, त़ा संगमेश्वर) असे आरोपीचे नाव आह़े.
संगमेश्वर पोलिसांनी आरोपीविरूद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत दोषारोपपत्र ठेवले होत़े. रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी खटल्याचा निकाल दिल़ा. न्यायालयापुढे विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून ऍड़ अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिल़े.
10 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास पीडित 10 वर्षीय मुलगी ही अंगणात सुकवण्यासाठी टाकलेल्या कपड्यांना चिमटे लावत होत़ी. यावेळी आरोपी याने पीडितेचा हात पकडून तिला मिठी मारल़ी तसेच तिच्याशी गैरप्रकार केल़ा. सायंकाळी आई घरी येताच घडलेली हकिगत पीडितेने आपल्या आईजवळ सांगितल़ी. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पीडितेच्या आईने आरोपीविरूद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल़ी, त्यानुसार पोलिसांनी आरोपी जीवा जाधव याच्याविरूद्ध भादंवि कलम 354, 354 अ, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 (पॉक्सो) चे 7, 8,12 व 9 एम नुसार गुन्हा दाखल केल़ा.
संगमेश्वर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरिक्षक उदय झावरे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरूद्ध न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े. एकूण 11 साक्षीदार सरकार पक्षाकडून तपासण्यात आल़े. न्यायालयापुढे पैरवी म्हणून पोलीस हवालदार अपूर्वा बापट यांनी काम पाहिल़े.