(चिपळूण)
चिपळूण नगर परीषदेच्या कै.श्रावणशेठ दळी सभागृहात दिनांक २२ ऑगस्ट रोजी व्यापारी वर्गाची आणि अधिकारी वर्गाची मिटींग आयोजित करणेत आली होती. या सभेमध्ये पोलीसस्टेशनचे डिवायएसपी बारी,एपीआय शिंदे तसेच मुख्याधिकारी शिंगटे, चिपळूण एसटी डेपो मँनेजर राजेशिर्कै, MSEB चे बोयणे, नगरपरीषदेचे अधिकारी वर्ग व बाजारपेठेतील व्यापारी पदाधिकारी हजर होते.
सदर सभेमध्ये विजेच्या खेळखंडोबाबत, नवीन ट्रान्सफर बसवणेबाबत चर्चा झाली. त्यावर अधिकारी यांनी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. एसटी डेपोकडून गणेशोत्सव काळात ट्रँफिक कशा प्रकारे वळवता येईल यावर साधकबाधक चर्चा झाली. पोलीसस्टेशनकडून सणासुदीला वन वे ठिकाणी तसेच रहदारीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कसा राहील याबाबत आश्वासन देण्यात आले. तसेच उक्ताडकडून येणारी बाहेरच्या बाहेर कशी जातील, वाहतुकीला अडचण होणार यावरही निर्णय करण्याचे आश्वासन दिले गेले.
नगरपरीषदेकडून वाहतुकीला बाजारपेठेत होणारे अडथळे, परप्रांतीयांना व्यवसाय करणेसाठी बंदी, बाहेरचे लोक येऊन विक्री करणेवर बंदी, पार्किंग लाँट पूर्णपणे वापरात आणणेसाठी योग्य पावले उचलणे, भाजी मंडईखाली टु व्हिलर तात्पुरते पार्किंग करणे. तसेच गणेशोत्वसव काळात शक्य झाले तर पिक अव्हरमध्ये चारचाकींना बाजारपेठेतून पर्यायी मार्ग उपलब्ध करणे, बँरेकीट लावून दूचाकीच बाजारपेठेत येऊ शकतील का, अशी साधकबाधक चर्चा झाली.
यावेळीं बापूसाहेब काणे,कांता चिपळूणकर, संदेश भालेकर, पारस ओसवाल, वासूदेव भांबूरे, लियाकत शहा, सौरभ मिर्लेकर, विजय चितळे इत्यादी व्यापारींनी चर्चेत सहभाग घेतला. संघटनेचे सचीव उदय ओतारी यांनी सुत्रसंचलन केले. कार्याध्यक्ष किशोर रेडीज, अध्यक्ष शिरीष काटकर यांनी सभा उत्तमरित्या चालवली.