चिपळूण : चिपळूण शहरालगतच्या वालोपे येथील रेल्वे स्टेशन परिसरातील स्टॉलधारकांना उदभवणार्या समस्या तातडीने सोडवाव्यात, असे निवेदन आमदार शेखर निकम यांनी रत्नागिरी येथील रेल्वेचे रिजनल मॅनेजर उपेंद्र शेंडे यांना दिले आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवाही बंद असल्याने सदर कालावधीत स्टॉलधारकांनी आगाऊ भरलेल्या भाड्यांची परतफेड, रत्नागिरीच्या निकषावर चिपळूण व खेडला लायसन्स फी आकारू नये, अद्याप सर्व गाड्या सुरू नसल्याने काही स्टॉल धारकांना वीज, पाणी व इतर खर्च भागविणे अशक्य झाल्याने व्यवसाय बंद असताना आकारण्यात आलेली लायसन्स फी माफ व्हावी, रेल्वे कर्मचार्यांबरोबर सर्व स्टॉलधारक, कर्मचारी यांची कोविड तपासणी व लसीकरण करावे, कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती संपल्यानंतर तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट अवधीमध्ये वाढ, विक्री करावयाचे पदार्थ वाढवून त्याचा दरही वाढीवरित्या निश्चित करून मिळावा अशा अनेक प्रलंबित मागण्या या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या आहेत.