(चिपळूण / प्रतिनिधी)
जागतिक वनदिनानिमित्त दि. २१ मार्च २०२३ रोजी संपन्न झालेल्या अनुबंध संस्था चिपळूण आयोजीत महाविद्यालयीन गटामध्ये डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये वैयक्तिक स्पर्धेत कु. अविनाश रहाटे याने रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक व अनुराधा तिकुटे हिने चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच समूह गीतगायन स्पर्धेमध्ये सौरवी काजारे, रेश्मा कोदारे, रसिका खापरे, प्रांजली शिंदे, सुश्मिता राणी व साहिल केळकर यांनी प्रथम क्रमांक व लघुनाटीका स्पर्धेत वैभव तांबे, प्रतीक गोसावी, साहिल केळकर, संकेत राणीम, सम्यक मोहिते, विक्की मोहिते, विवेक दुर्गोळी, संकेत दुर्गोळी, रसिका खापरे, दीक्षा गावणंग, सौरवी काजारे, रेश्मा कोदारे, प्रांजली शिंदे, सुश्मिता राणीम या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच साहिल केळकर याला उत्कृष्ट ढोळकी पट्ट म्हणून गौरविण्यात आले.
पारीतोषिके वितरण चिपळूण तालुक्याचे उपनिरक्षक मा. श्याम आरमाडकर व वन अधिकारी मा. धनश्री कीर यांच्या हस्ते करण्यात आले. या यशाबद्दल कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संस्थेचे संस्थापक डॉ. तानाजीराव चोरगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, सचिव मिलिंद सुर्वे, अधिक्षक प्रफुल्ल सुर्वे व महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अंजलीताई चोरगे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.