(चिपळूण)
कोणालाही न सांगता रागाच्या भरात घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता तरूणाला येथील पोलिसांनी नुकतेच चंदीगडहून आणून पालकांच्या स्वाधीन केले. सिद्धांत दीपक महाडीक (२२, रा. कामथे, चिपळूण) असे या तरूणाचे नाव आहे.
सिद्धांत कोणालाही न सांगता ८ जून रोजी रागाच्या भरात घरातून निघून गेला होता. याप्रकरणी त्याच्या पालकांनी येथील पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. तो चंदीगड येथे असल्याची गोपनीय माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. त्यानुसार या तरूणाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल ठाकूर, पोलीस नाईक प्रमोद कदम हे चंदीगडला रवाना झाले. तेथे तीन दिवस शोध घेत त्यांनी सिद्धांतला ताब्यात घेतले व चिपळूण पोलीस स्थानकात आणत पालकांच्या स्वाधीन केले.