(रत्नागिरी)
चिपळूण येथे उड्डाणपूल कोसळून झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, राज्य उपाध्यक्ष जान्हवी पाटील, प्रसिद्ध प्रमुख जमीर खलफे, सतीश पालकर, रहीम दलाल, अमोल डोंगरे, शकील गवाणकर, केतन पिलणकर आदी उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १२ वर्षे प्रलंबित आहे. या संदर्भात मराठी पत्रकार परिषद सातत्याने पाठपुरावा करत आहे. अजूनही महामार्गाचे काम अपूर्ण आहे यातीलच चिपळूण उड्डाणपूलाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.
बहादूरशेख नाका चिपळूण येथील हा उड्डाणपूल वापरापूर्वीच काल दिनांक १६ ऑक्टोबर रोजी कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी या घटनेचे गांभीर्य पाहता संबंधितांची सखोल व निष्पक्षपाती चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मराठी पत्रकार परिषद जिल्हा रत्नागिरीची मागणी आहे.