( चिपळूण / प्रतिनिधी )
तालुक्यातील अलोरे देउळवाडी येथे बंद घर फोडून 46 हजार 400 रुपयांचे दागिने अज्ञाताने लंपास केल्याची घटना 29 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद यशवंत तातोजीराव साळुंखे (64, देउळवाडी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत साळुंखे हे 29 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान नातेवाईकांकडे कोल्हापूर येथे राहण्यासाठी गेले होते. या दरम्यान अज्ञाताने त्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेली 10 हजारांची रोख रक्कम, तसेच सोन्याचे दागिने चोरीस गेले. यामध्ये 15 हजार रुपये किंमतीची लहान मुलांचे गळयातील सोन्याची चेन, 7 हजार रुपये लहान मुलांची वाळी, 7 हजार रुपयांची दोन सोन्याची पाने, 3600 रुपये किंमतीचे लहान मुलांचे चांदीचे दागिने तसेच पैंजण, कमरपट्टा, मनगटी असे 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे जुने दागिने असा एकूण 46 हजार 400 रुपये किंमतीचा ऐवज लंपास झाला.
साळुंखे हे कोल्हापूरहून आल्यानंतर त्यांना घरातील दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.