( प्रतिनिधी / चिपळूण )
चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथे 19 वर्षीय विवाहीत महिलेने अज्ञात कारणावरुन गळफास लावून घेतल्याची घटना समोर आली आह. धनश्री महेश थोरात (19, उंब्रज, कराड, जि. सातारा) असे आत्महत्या करणार्या नवविवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री थोरात हिने दीड महिन्यापूर्वी महेश महादेव थोरात (रा. उंब्रज, कराड, जि. सातारा) याच्यासोबत लग्न केल्याचे घरी कळवले होेते. 10 जुलै रोजी धनश्री हिच्या आईने तिला एस.आय.पी. च्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी फोन करुन बोलावून घेतले होते. 10 रोजी ती चिपळूण येथील आपल्या आईच्या घरी आली. 11 जुलै रोजी दुपारी 12 वा. च्या सुमारास जेवण करुन तिच्या खोलीमध्ये गेली. मात्र काही वेळानंतर ती नायलॉनच्या ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
याबाबतची खबर यल्लापा लक्ष्मण पवार यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.