(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे रस्ता ओलांडणार्या प्रौढाला दुचाकीस्वाराने जोरदार धडक देवून फरार झाल्याची घटना 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास घडली. या धडकेत पादचारी प्रौढाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अपरांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. बबन भाग्या डोर्लेकर (51, नोकरी, हिंदुस्थान युनिलिव्हर लि. कंपनी, चिपळूण) असे जखमी प्रौढाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन डोर्लेकर हे रस्ता क्रॉस करत असता अचानक एक मोटरसायकरस्वार भरधाव वेगाने येवून जोरदार धडक दिली. अपघातानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी रिक्षात बसवून डोर्लेकर यांना अपरांत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या धडकेत बबन डोर्लेकर यांच्या डोक्याला, उजव्या डोळयाला तसेच जबडयाला जबर दुखापत होवून जबडा फ्रॅक्चर झाला आहे. तसेच डोळयाखाली टाके टाकण्यात आले आहेत.
बबन डोर्लेकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात दुचाकीस्वार दुखापतीस कारणीभूत ठरुन, जखमीला मदत न करता निघून गेल्याप्रकरणी भादवि कलम 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184, 134 अ, ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.