वनखात्याची परवानगी न घेता बेकायदेशीर वृक्षतोड करून साठवलेला लाकडांचा साठा वन विभागाने ताब्यात घेऊन जवळच्या स्मशानभूमीत पुरविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शौकत मुकादम यांनी वन विभागाला पत्र लिहून केली आहे. लॉकडाऊनच्या काळात परजिल्ह्यात वाहतूक करणे कठीण जात असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्यालगत तोडलेली झाडे रचून ठेवल्याचे दिसून येत आहे.