(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील कुटरे जिनगरेवाडी येथे बेकायदा गावठी दारु बाळगणाऱ्या वृद्धावर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश शंकर जिनगरे (60, कुटरे-जिनगरेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद रेखा मेश्राम यांनी दिली.
जिनगरे याने त्याच्या घराच्या आडोशाला गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगली होती. त्याच्याकडून 970 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.