( चिपळूण / प्रतिनिधी )
तालुक्यातील कळंबट, फणसवाडी येथे चोरटयांनी घरफोडी करुन दागिन्यांसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद सुवर्णा गावडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा गावडे या घराला लॉक लावून 19 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान बाहेर गावी गेल्या होत्या. या दरम्यान बंद घराची कौले काढून अज्ञाताने घरात प्रवेश केला. लोेखंडी कपाटातील लॉकर तोडून 60 हजार रुपयांची रोख रक्कम, 1 लाख 15 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.