(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण येथे शुल्लक कारणावरुन पतीने पत्नीवर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार सायली शैलेश चव्हाण (32) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शैलेश सुरेश चव्हाणअसे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. ते तिनवड, मैत्रीपार्क चिपळूण येथे भाडयाने राहतात. ही घटना 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली व शैलेश हे दोघे नात्याने पती-पत्नी आहेत. शैलेश चव्हाण याला दारुचे व्यसन आहे. तो दारुच्या नशेत पत्नीला व मुलांना शिवीगाळ करतो. 15 सप्टेंबर रोजी शैलेश याचा मित्र गणेश देवरुखकर याला सायली यांनी विचारले की, तू काल कशाला घरी आला होता. या गोष्टीचा राग पती शैलेश याला आल्याने त्याने सायली यांच्या दंडावर व डाव्या हाताच्या अंगठयावर तसेच हनुवटीवर चाकूने वार करुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली.
जखमी झालेल्या सायली यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार पती शैलेश याच्यावर भादविकलम 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.