(चिपळूण)
सोन्याच्या बांगड्या पॉलिश करून देतो, असा बहाणा करून एकाने महिलेच्या तोंडावर पांढऱ्या रंगाची पावडर फेकून बांगड्या घेऊन भामट्याने पलायन केले. यामध्ये दीड लाख रूपये किंमतीच्या अडीच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्याने लांबविल्या आहेत. चिपळूण शहरात हा प्रकार गुरूवारी (ता. ५) सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.
या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तुमच्या सोन्याच्या बांगड्या चमकावून देतो, असे सांगून बांगड्या घेतल्या. त्यानंतर संबंधीत महिलेच्या तोंडावर पावडर टाकून तो बांगड्या घेऊन पसार झाला. या प्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.