(चिपळूण)
चिपळूण शहरालगतच्या वालोपे वरचीवाडी सीमेवर गवळयाची डाग येथील जंगलात एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडल्याने ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टॉवेलसारख्या कापडाच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आला. या तरुणाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असण्याची शक्यता आहे. त्याची उंची पाच फुट असून अंगावर डार्प निळ्या रंगाची टीशर्ट आणि बरमुडा आहे, मात्र मृतदेहाची ओळख पटलेली नाही.