(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील गांग्रई खाडीकिनारी चोरटी वाळू उपसा करणार्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे वाळूसह सुमारे 5 लाख 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांग्रई येथील पोलीस पाटील अनंत जोगळे व कोतवाल विजय सांगळे गस्तीकरीता खाडीकिनारी गेले असता डंपरमधून चोरटी वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले. त्यांनी डंपर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र डंपर चालक न थांबता निघून गेला. याबाबतची फिर्याद तलाठी अश्विनी बोरसे यांनी येथील पोलीस स्थानकात दाखल केली. डंपर चालकाला ताब्यात घेवून त्याच्याकडून 5 लाखाचा डंपर, 20 हजार 800 रुपयांची वाळू जप्त करण्यात आली. स्वप्नील केशव पडवळ (गांग्रई, चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर भादविकलम 379, जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.