(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील कापसाळ डीगेवाडी येथील धरणावर आंघोळीसाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यूू झाल्याची दुर्दैवी घटना 27 मार्च रोजी दुपारी 2.30 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हरिश्चंद्र धुरी (28, डीगेवाडी चिपळूण), अक्षय पडवळ व अमोल अमृत तेली (28, परेल, भोईवाडा, मुंबई), असे तिघेजण धरणावरती आंघोळ करण्यासाठी गेले होते. आंघोळ करत असताना अमोल तेली हा पाण्यात बुडू लागला. मात्र त्याला पोहता येत नसल्याने खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
याबाबतची फिर्याद सागर हरिश्चंद्र धुरी याने चिपळूण पोलीस स्थानकात दिली. अधिक तपास पोलीस नाईक ठाकूर करत आहेत.