(चिपळूण /ओंकार रेळेकर)
चिपळूणमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती रविवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती सोहळ्यात मराठा समाज बांधवांच्या एकोप्याचे दर्शन झाले. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी कोकणातील प्रतिष्ठित उद्योजक प्रकाश देशमुख आणि मराठा समाज बांधव यांचा विशेष पुढाकार होता.
येथील हायवे नजीक उद्योजक प्रकाश देशमुख यांच्या अतिथी हॉटेलच्या नवीन अतिथी ग्रँड सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मराठा समाजातील महिला व पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता कार्यक्रमाच्या प्रारंभी, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्पहार घालून त्यांना वंदन करण्यात आले. याचवेळी जिजाऊ वंदना गीत गाऊन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सतीश कदम राकेश शिंदे, दिलीप देसाई, प्रकाश देशमुख, सतीश मोरे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहासातील काही प्रसंग कथन केले. संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षांमध्ये जो पराक्रम गाजवून अतुलनीय कामगिरी बजावली व स्वराज्यासाठी, धर्मासाठी सर्वोच्च बलिदान केले त्याचा उल्लेख करून सर्वांनी अभिवादन केले.
याच कार्यक्रमामध्ये मराठा समाजातील नवी व तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचे ठरले समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षा व इतर शासकीय परीक्षांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माहिती गोळा करून त्यानुसार उपक्रमाचे आयोजन करण्याचाही निर्णय करण्यात आला. तसेच समाजाचे वधू वर सूचक मंडळ व पतपेढी स्थापन करण्याचाही यावेळी निर्णय घेण्यात आला. मराठा समाजातील जे व्यवसाय व उद्योग करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व व्यावसायिक सहकार्य करण्यासाठी त्यांची माहिती घेऊन समाजातील लोकांना लोकांनी त्यांच्यापर्यंत व्यवसाय निमित्त पोहोचावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष सावंतदेसाई यांनी केले तर मकरंद जाधव यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला मालतीताई पवार, अंजली कदम,निर्मला जाधव, दीप्ती सावंत देसाई , सीमाताई चाळके, रचना शिंदे, अक्षरा जाधव, प्रज्ञा मोरे, सुकन्या चव्हाण, ऐश्वर्याताई घोसाळकर. स्मिता खंडाळे, पूर्वा तांदळे, भाग्यश्री चोरगे, वीणा फाळके, स्वरा शिंदे, मधुरा मोरे, समर्था आंब्रे तसेच प्रकाश देशमुख, दिलीप देसाई, सतीश मोरे, सतीश कदम, राकेश शिंदे, दीपक शिंदे, सुबोध सावंतदेसाई, दिपक शिंदे, मकरंद जाधव, सुनील चव्हाण, संतोष सावंतदेसाई, रमन डांगे, बाळू शिंदे, रमेश शिंदे, राजेश चव्हाण, सुनील सावंतदेसाई, वैभव पवार, सचिन नलावडे, राहूल शिंदे ,अक्षरा जाधव व सौ.मोरे आदी उपस्थित होते.