(चिपळूण)
एका नागरिकाला 78 हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना 8 मे रोजी घडली आहे. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात शुक्रवारी आज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका नागरिकाने त्याच्याकडील स्मार्ट फोनवरुन त्याच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरुन क्रिप्टो करन्सीबाबत चॅटींग करुन त्यांनी 35 हजार रुपये गुंतवणूक करण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या पेढांबे शाखेतील अकाऊंटवरुन त्याच्या मोबाईल गुगल पेवरुन 35 हजार रुपये गुंतवणूक केली.
त्यामध्ये झालेले प्रॉफिट काढून घेण्यास सांगून सदर वेबसाईवरुन सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर आणखी 43 हजार रुपये पाठवण्यास सांगितले व ते पाठवले. असे एकूण 78 हजार रुपये गुगल पे केले असून अज्ञात इसमाने क्रिप्टो करन्सीवर पैसे गुंतविल्यास प्रॉफिट होते असा विश्वास संपादन करुन त्या नागरिकाने गुंतवणूक करुन ते पैसे काढून घेत एकूण 78 हजार रुपयाची फसवणूक केली.