(चिपळूण)
तालुक्यातील पेढांबे येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. वैभव रवींद्र राणे (22, पेढांबे-टाकेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हा घरी एकटाच होता. घरी कोणीही नसताना त्याने हॉलमधील सिलिंग फॅनला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.