(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील पालवण कोष्टेवाडी येथे विहिरीत उदमांजर आढळले. या उदमांजराला वनविभागाने जंगलात सोडून जीवदान दिले आहे. ही घटना मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी घडली.
पालवण कोष्टेवाडी येथील हेमंत विश्वनाथ उपरे यांच्या घराशेजारील असलेल्या विहिरीत उदमांजर प्रजातीचे पिल्लू पडले असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. ग्रामस्थांनी लगेचच याची माहिती वनविभागाला दिली. वनविभाग तात्काळ घटनास्थळी दाखल आहे. यानंतर विभागीय वनअधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी राजेश्री किर, वनपाल उमेश आखाडे, वनपाल सुरेश उपरे, नांदगाव वनरक्षक अश्विनी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत या उदमांजराच्या पिल्लाला सुरक्षितरित्या बाहेर काढत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.