(चिपळूण)
राज्यपाल यांनी महाराष्ट्र द्वेषातून जे वक्तव्य केले त्या विरोधात आणि महाराष्ट्र द्वेष्याला जाब विचारण्यासाठी व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने १ ऑगस्ट २०२२ पासून १० लाख पत्र राज्यभरातून पाठविण्याचे आदेश युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी दिले होते. यानुसार आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री योगेश चंद्रकांत शिर्के यांच्या पुढाकाराने हजारो पत्र पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवर शहर अध्यक्ष मिंलिद कापडी , शिरिष काटकर, जिल्हा व्यापारी अध्यक्ष मुराद अडरेकर, अविनाश केळस्कर, युवक तालुका अध्यक्ष समिर पवार, युवक शहर अध्यक्ष सिद्धेश लाड युवती शहर अध्यक्षा जानवी फोडकर, सोशल मिडिया अध्यक्ष सचिन साडविलकर, अक्षय केदारी, किशोर कदम, सचिन शिंदे, रंजिता ओतारी, अविनाश हरदारे, पुनम भोजने, विनायक पाटेकर, काशिद मँडम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.