( चिपळूण/ प्रतिनिधी )
दोन दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे चिपळूण शहरातील रस्त्यांवर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच धरण परिसरात प्रचंड पाउस असल्याने धरण प्रशासन 1 किवा 2 टर्बाइन सुरु करणार असुन संध्याकाळी 7.30 पर्यंत भरती असणार आहे. शिवाय पावसाचे पाणी व टर्बाइनचे पाणी वाढू शकते तरी सर्व व्यापारी व नागरिकानी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.आता एक टर्बाइन सुरू आहे अशी माहिती मुख्य अभियंता चोपडे यांनी दिली.
साधारण दोन तास वाट बघून ते टरबाइन बंद करण्यात येईल व संध्याकाळी जर पाऊस आटोक्यात असेल तर ते टर्बाइन बंदच राहील असेही चोपडे यांनी सांगितले. संध्याकाळी भरती असल्याने शक्यतो विसर्ग करण्यात येणार नाही परंतु जर धरण क्षेत्रात पाऊस खूपच वाढला तर मात्र तर टर्बाइन चालू ठेवावा लागेल असेही त्यांनी सांगितले.
सध्या कोळकेवाडी धरण ओवरप्लो असल्याने पाणी टर्बाईन्व्दारे सोडावे लागत आहे. नवजा व पोफळी परिसरात पाऊस खूप आहे, मात्र धरण क्षेत्रात पाणी कमी आहे.