( रत्नागिरी / प्रतिनिधी )
चिपळूण तालुक्यातील घोणसरे- चिवेली फाटा, चिपळूण येथे काही व्यक्ति वन्यजीवी प्राण्यांचे कातडे विक्रीकरिता चिपळूण येथे घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चिपळूणचे सहायक वनसंरक्षक घटनास्थळी दाखल झाले. दहशतवादी विरोधी शाखा, रत्नागिरीला याची माहिती मिळताच घोणसरे- चिवेली फाटा येथे सापळा रचण्यात आला. जवळच असणाऱ्या मोकळ्या मैदानात, ३ इसम संशयितरित्या वावरताना पोलिसाना दिसून आले. पोलिसांनी तिथे जाऊन कसून तपासणी केली असता एकाच्या ताब्यात असणाऱ्या सॅक मध्ये पट्टेरी वाघाचे कातडे” आढळून आले. ही कारवाई 30 डिसेंबर रोजी करण्यात आली.
पोलिसांनी लगेचच तिघांनाही मुद्देमालासह ताब्यात घेतले. तिघांवर वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ५० व ५१ प्रमाणे चिपळूण येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यामधील वन्यजीवी प्राण्याची (वाघाची) हत्या / शिकार कोठे झाली आहे? याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस उप निरीक्षक, श्री. विनायक नरवणे, ओ. टी. बी रत्नागिरी, सहा.पो.फी / ८६८ श्री. गोरे, ओ.टी.बी. रत्नागिरी., पोहवा / ११६२ श्री. चांदणे, ओ.टी.बी, रत्नागिरी, पोहवा / १४९१ श्री. भुजबळरव, ओ.टी.बी. रत्नागिरी, पोहवा / ४०९ श्री. शेलार, ओ.टी.बी. रत्नागिरी, पोहवा / ८२९ श्री. गुरव, ओ.टी.बी, रत्नागिरी, पोकों / ४२ श्री. मोरे, पोलीस मुख्यालय, रत्नागिरी, चा. सहा. पो. फौ / २६१ श्री. कदम, ओ.टी.बी, रत्नागिरी, श्री. दौलत रामचंद्र भोसले, वनपरिमंडळ अधिकारी, चिपळूण व श्री. सचिन निलख, सहायक वनसंरक्षक, (रत्नागिरी) चिपळूण यांनी केली.