( चिपळूण )
तालुक्यातील येगाव-ढीगबाववाडी येथील मधुकर रामचंद्र जोंधळे (५५, येगाव-ढोगबाववाडी) हे घरातून कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना १८ जुलै २०२१ रोजी घडली होती. मात्र २ वर्षे होत आली तरी त्यांचा अद्याप शोध लागला नाही. याची खबर संतोष जोंधळे (४२, येगाव-ढोगबाववाडी) यांनी दिली.
मधुकर जोंधळे यांचा रंग सावळा असून उंची ५ फूट ४ इंच आहे. त्यांचे शिक्षण ३री झाले आहे. त्यांनी सफेद रंगाची सॅन्डो बनियान व हाफ पॅन्ट तसेच पायात चप्पल परिधान केली आहे. तरी अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास याची माहिती सावर्डे पोलीस स्थानक तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश कांबळे (८४०७९०१४१०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.