( चिपळूण / प्रतिनिधी )
नृत्य क्षेत्रातील पहिल्या भारतीय संघाच्या पोस्टरचे चिपळूण येथील डायनाज डान्स स्टुडिओमध्ये दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
चिपळुणातील डायनाज डान्स स्टुडिओ मधील काही विद्यार्थ्यांची भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. त्यांच्या प्रमोशन पोस्टरचे अनावरण चिपळूण -संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
डायनाज डान्स स्टुडिओ गेले 15 वर्ष चिपळूणमधील विद्यार्थ्यांकरिता अनेक उपक्रम राबविले जात असतात. परंतु गेल्या पाच वर्षात हा स्टुडिओ सलग पाचव्यांदा राष्ट्रीय सुवर्णपदकाचा मानकरी ठरत असून भारतीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरांमध्ये कोरले आहे. रत्नागिरी जिल्हा व चिपळूण तालुक्याकरिता ही अभिमानास्पद बाब आहे. आज पर्यंत आपण क्रिकेट, फुटबॉल, हॉकी ह्यामध्ये आपण एशियन कप तसेच साउथ एशियन कप ऐकले होते व पाहिले होते. परंतु डान्स या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच साउथ एशियन कप हे नेपाल काठमांडू येथे होत असून चिपळूणमधील प्रसिद्ध असणारे डान्स या क्षेत्रामध्ये डायनाज डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांचे डान्स स्पोर्ट्स असोसिएशन भारत ह्या भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. हा ग्रुप 14 वर्षाखालील पहिला भारतीय संघ आहे.जो भारताचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी करणार आहे. या ग्रूपमध्ये सहभागी विद्यार्थी, कुमारी सिया शिर्के, रेहानशी दांडेकर, स्वरांजली निमकर , नीती चौधरी , अंतरा भुवड , अदिती खेराडे , राधा मोहिते , आहाना पवार, कुमार साद शेख , साईराज महाडिक हे विद्यार्थी भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून त्यांच्या प्रमोशन तसेच प्रसिद्धीसाठी चिपळूणमध्ये त्यांच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक केले. तसेच चिपळुणातील डायडाज डान्स स्टुडिओ मधील काही विद्यार्थ्यांची भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली.
या डान्स स्टुडिओचे संचालक व भारतीय संघाचे प्रशिक्षक सुरज जाधव यांच्या पाठीवर आशीर्वादाची व कौतुकाची थाप देऊन पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगरसेविका सीमाताई चाळके , नंदा चिपळूणकर मॅडम, माजी नगरसेवक मनोज जाधव, युवती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव प्रणिता घाडगे, अक्षय केदारी, सचिन साडविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.