(नवी दिल्ली)
चिनी मोबाईल कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल, तर त्यांना त्यांच्या स्थानिक कामकाजासाठी भारतीय भागीदार निवडावे लागतील, असा आदेश भारत सरकारने काढला आहेत. भारतात चिनी स्मार्टफोन कंपन्यांची मोठी बाजारपेठ असल्यामुळे भारत सरकारने ही भूमिका घेतली आहे.
याबाबत सरकारने स्पष्टपणे म्हटले की, जर चिनी कंपन्यांना भारतात त्यांचे उत्पादन विकायचा असेल, तर त्यांचे स्थानिक भागीदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी आणि मुख्य तांत्रिक अधिकारी भारतीय असावेत. भारत सरकारच्या या अटींचे पालन चिनी कंपन्यांना करावे लागेल.
भारतात चिनी स्मार्टफोन कंपन्यांची मोठी बाजारपेठ आहे. शाओमी, ओप्पो, कुलपॅड, वनप्लससारख्या मोबाईल फोन कंपन्या भारतात प्रचंड व्यवसाय करतात व एकट्याने नफा कमावतात; पण इथून पुढे हे बंद होणार आहे. चिनी मोबाईल कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल, तर त्यांना त्यांच्या स्थानिक कामकाजासाठी भारतीय भागीदार निवडावेच लागतील, असा नियम सरकारने जारी केला आहे.
भारतीय भागीदाराशिवाय या कंपन्या भारतात उत्पादनही करू शकणार नाहीत. चिनी कंपन्यांना आपला मोबाईल फोन किंवा इतर उत्पादने भारतात बनवायची आणि विकायची असतील, तर सरकारच्या अटींचे पालन करावे लागणार आहे.