(मुंबई)
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रपटाच्या शुटिंगसाठी अन्य राज्यातून मुंबईत आलेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणी चित्रपटाच्या शूटिंगसाठी हरियाणावरून मुंबईत आली होती. या १९ वर्षीय तरुणीवर तिच्या सहकाऱ्यानेच बलात्कार केला आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ३८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रात्रीच्या वेळी कोणीतरी तिच्या रुमची बेल वाजवली. तिने दरवाजा उघडला असता आरोपीने जबरदस्तीने तिच्या रुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केली. पीडितेने विरोध केला असता, त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पीडितेने तातडीने पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.