(आरोग्य)
आजकाल जीवनशैली आणि आहार असा झाला आहे की गुडघेदुखीची समस्या कायम राहते. त्यातच जर तुम्ही वयाची चाळीशी पार केली असेल तर तुम्हाला आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. या वयात बहुतांश व्यक्तींची विशेषतः महिलांची हाडं दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे काही महिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच औषधं घेण्यास सुरुवात करतात. मात्र याचे कालांतराने वाईट परिणाम दिसू लागतात. परंतु जर तुम्ही योग्य वेळेतच फिजिकल अॅक्टिव्हिटी ते हेल्दी डाएट सारख्या गोष्टींकडे लक्ष दिले तर तुमची हाडं अधिक मजबूत होण्यास मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त हाडं दुखणे आणि बोन फ्रॅक्चर सारख्या समस्यांपासून दूर राहू शकाल. हाडं मजबूत राहण्यासाठी तुम्ही पुढील टीप्स फॉलो करा
लठ्ठपणा हे बहुतेक महिलांच्या गुडघेदुखीच्या समस्येचे प्रमुख कारण आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना सामान्यतः लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. जास्त वजनामुळे गुडघ्यांवर दबाव येतो. डॉक्टर म्हणतात की गुडघा त्याच्या वजनाच्या 5 पट दाब सहन करतो. महिला लठ्ठ झाल्या तर त्यांना गुडघेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान आणि मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीनंतर, शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी कमी होते. इस्ट्रोजेन हार्मोन हे गुडघे निरोगी ठेवण्याचे काम करतो. पीरियड्समध्ये इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी झाली की त्याचा परिणाम गुडघ्यांवरही दिसून येतो.
हिरव्या पालेभाज्या
तुम्ही डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करु शकता. यामध्ये पालक, ब्रोकली आणि पालेभाज्यांचा समावेश करावा. या भाज्यांमध्ये विटामिनसह कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. या भाज्यांमध्ये विटामिन सी सुद्धा असते. यामुळे तुमची हाडं अधिक मजबूत राहण्यास मदत होते.
स्ट्रेंथ ट्रेनिंग
हाडं मजबूत करण्यासाठी हेल्दी डाएटसह फिजिकल अॅक्टिव्हिटीची सुद्धा गरज असते. दररोज व्यायाम जरुर करा. तुम्ही वॉकिंग, जॉगिंग आणि एरोबिक्स सारख्या अॅक्टिव्हिटी करु शकता. यामुळे ही तुमची हाडं मजबूत होऊ शकतात. दररोज व्ययाम केल्याने आरोग्यसंबंधित समस्या ही दूर होतात.
कॅल्शिअमयुक्त डाएट
शरिरातील हाडं ही कॅल्शिअम पासून बनलेली असतात. कॅल्शिअमयुक्त फुड्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते कॅल्शिअममुळे हाडं मजबूत होतात. त्यामुळे तु्म्ही डाएटमध्ये दुध, चीज आणि कॅल्शिअमयुक्त फूड्सचा सुद्धा समावेश करु शकता. यामुळे उच्च रक्तदाब आणि हार्मोनचा स्तर ही नियंत्रणात राहतो.
प्रोटीनयुक्त डाएट
हाडांना बळकटी देण्यासाठी प्रोटीनयुक्त डाएट खा. तुम्ही डाएटमध्ये टोफू, छोले आणि अळशीच्या बियांचा समावेश करु शकता. प्रोटीनयुक्त फूड्स तुम्हाला हाडांसंबंधित समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता ही कमी होते.
स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर रहा
स्मोकिंग आणि अल्कोहोलमुळे तुमच्या आरोग्याला फार धोका पोहचू शकते. यामुळे तुमच्या हाडांना नुकसान ही पोहचते. यामुळे स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
हेल्दी वजन
आरोग्यदायी राहण्यासाठी हेल्दी वजन असणे फार गरजेचे असते. असा प्रकारचे डाएट खा, जेणेकरुन तुमचे वजन नियंत्रणात राहिल. त्याचसोबत तुमच्या हाडांना बळकटी ही मिळेल.
याबाबत घ्या काळजी
1) गुडघे निरोगी ठेवायचे असतील तर गुडघ्यांवर जास्त दबाव येईल असा व्यायाम करणे टाळावे. गुडघ्यांमधील कार्टिलेजचे नुकसान होता कामा नये, अन्यथा त्रास वाढू शकतो.
2) वजनाची विशेष काळजी घेतली पाहिजे. जास्त वजन असेल तर गुडघ्यांवर खूप दबाव येतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
3) बरेच लोक पटकन उठून बसतात. धावपळ करतात, व्यस्त करतात. चुकीची योगासने करतात. त्यामुळे ताण येऊन गुडघे दुखू शकतात. वेदना वाढू शकतात.
4) गुडघ्यांना सूज आली, किंवा वेदना अथवा इतर समस्या जाणवल्या तर महिलांनी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. यामुळे समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
आहारात काय घ्याल
अननस : अननस केवळ चवीलाच चांगले नाही तर त्याच्या रोजच्या सेवनाने हाडेही मजबूत होतात आणि त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास देखील कमी होऊ शकतो. हे वेदना कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. अननसमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हाडे मजबूत ठेवायची असतील तर रोज थोड्या अननसाचे सेवन करा.
हळद : हळदीचे सेवन तुम्ही अनेकदा जेवणात मसाला म्हणून करत असाल, हळदीच्या सेवनाने जेवणाची चव तर वाढतेच पण ती शरीरासाठीही खूप फायदेशीर मानली जाते, हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात जे हाडे टिकवून ठेवण्यास मदत करतात. हळदीचे सेवन केल्याने हाडांची समस्या दूर होते. गुडघेदुखी कायम राहिल्यास तुम्ही हळदीचेही सेवन करू शकता. गुडघेदुखीची समस्या दूर करण्यासोबतच याच्या सेवनाने जळजळ होण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
सुका मेवा : सुक्या मेव्याचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले असते, सुक्या मेव्याचे सेवन केल्याने तुमच्या हाडांचे आरोग्य दीर्घकाळ मजबूत राहते, जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत ठेवायची असतील तर सुक्या मेव्यांचा यामध्ये समावेश करू शकता. जसे काजू, बदाम, बेदाणे. इ. हे सर्व ड्राय फ्रूट्स तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. त्याच वेळी, त्यांचे सेवन केल्याने तुमचे गुडघे मजबूत होतात आणि सांध्यातील वेदना देखील दूर होतात.
लसूण : लसूण हे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणांनी समृद्ध आहे. लसणाचे सेवन तुम्ही अनेक प्रकारे करू शकता, जसे की जेवणात मसाला, चटणी इत्यादी सर्व प्रकारे ते खूप फायदेशीर ठरते.
ही आसने फायदेशीर
० सेतुबंधन
संधिवाताने ग्रस्त लोकांना सेतुबंधन केल्याने फायदा होतो. यामुळे संपूर्ण शरीरात ताण येतो. मान, कंबर आणि गुडघ्यांची हाडे मजबूत करतात. हे आसन दररोज केल्याने स्नायूंमध्ये लवचिकता आणि ताकद येते. अशा परिस्थितीत, रोगांपासून दूर राहण्याबरोबरच, ते चांगल्या शारीरिक विकासास मदत करते. परंतु मानेच्या, पाठदुखीने ग्रस्त असलेल्या लोकांनी हे आसन करणे टाळावे.
० भुजंगासन
हे योगासन कोब्रा पोझ म्हणूनही ओळखले जाते. असे केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो. यासह, मनगट आणि बोटांमध्ये देखील ताकद येते. संपूर्ण शरीरात ताण जाणवतो. यामुळे हाडे मजबूत होण्यास तसेच खालच्या पाठीला चांगला आधार मिळण्यास मदत होते. यासोबतच बोटांच्या सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.
० वीरभद्रसन
हे आसन केल्याने पाय आणि हातांची हाडे मजबूत होतात. संपूर्ण शरीरात एक ताण येतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. हे चांगल्या शारीरिक विकासास मदत करते.
० वृक्षासन
हे योग आसन केल्याने मणक्याचे, कंबरेचे आणि ओटीपोटाचे हाड मजबूत होते. यासह एकाग्रतेची शक्ती वाढते.