( नवी मुंबई )
नवी मुंबईतील नेरुळ परिसरातील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. अग्निशमन दल, नवी मुंबई महामंडळाचे अधिकारी बचावकार्यात गुंतले आहेत. ही घटना काल रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नेरळ येथील सेक्टर ६ मधील तुलसी भवन या चार मजली इमारतीचा स्लॅब रात्री ९.३० च्या सुमारास कोसळला. इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून स्लॅब खाली कोसळत गेला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. आहेत. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने मदत कार्यात अडथळे येत होते
#WATCH | Maharashtra: A portion of a building collapsed in the Nerul area of Navi Mumbai. More details awaited. pic.twitter.com/z51aH8TAdv
— ANI (@ANI) August 23, 2023