( मुंबई )
मुंबई – गोवा हायवेवरील पेणनजीक गुरुवारी रात्री उशिरा स्फोटके आढळून आली होती. ही स्फोटके म्हणजे डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झालं आहे. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर नवी मुंबई आणि रायगडच्या बॉम्ब शोध पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळालं आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आणि उरण तालुक्यात संशयित बोट सापल्याने गेल्या महिन्यात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा रायगडमध्ये संशयस्पद वस्तू आढळल्याने खळबळ उडाली होती.
दरम्यान, मुंबई- गोवा हायवेवरील पुलाखाली मिळालेल्या स्फोटक सदृश्य वस्तुमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी, या बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये वायर आणि घड्याळाचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र आज या परिसरात आणखी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. नेमक्या या वस्तू कोणी ठेवल्या, या वस्तू ठेवण्यामागं त्याचा काय उद्देश काय होता याचा तपास करत असल्याची माहिती देखील सोमनाथ घार्गे यांनी दिली.