( देवळे / वार्ताहर )
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावच्या तंटामूक्त समिती अध्यक्ष पदी पाचव्या वर्षीही प्रकाश चाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेली चार वर्ष चाफवली गावाच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी प्रकाश चाळके यांची बिनविरोध निवड झाली होती. यावर्षीही त्यांच्या आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामामुळे बिनविरोध निवड करण्यात आली.
चाळके दै.र.टा.चे पत्रकारही आहेत. प्रकाश चाळके यांची तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी निवड झाल्याने पुष्पगुच्छ देऊन सरपंच सौ. आरोही रावण, उपसरपंच विजय घुमे, माजी उप सरपंच सुरेश चाळके, पो.पा. विजय चाळके यानी सत्कार केला. यावेळी अशोक कांबळे, सिद्धार्थ कांबळे, दीपक दळवी, ग्रामसेवक माईन ग्रा.स. विनय चाळके व चाफवली ग्रामस्थ उपस्थित होते.