चांद्रयान-३ हे अंतरयाळ बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. या विक्रमासोबतच इस्त्रोने लाईव्ह स्ट्रिमिंगचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर ८ दशलक्षाहून अधिक लोक चांद्रयान-३ चे लँडिंग लाईव्ह पाहत होते, हा एक विक्रम आहे. लाइव्ह स्ट्रिमिंगमध्ये जास्तीत जास्त वापरकर्ते मिळवणारे इस्रोचे चॅनल जगातील पहिले असे चॅनल ठरले आहे. चांद्रयान-३ च्या लँडिंगपूर्वी इस्रोच्या यूट्यूब चॅनेलच्या सब्सक्राइबर्सची संख्या २.६८ दशलक्ष म्हणजे सुमारे २६ लाख होती, जी यशस्वी लँडिंगनंतर आता ३५ लाख झाली आहे. केवळ एका तासाच्या लाइव्हमध्ये सुमारे १० लाख नवीन लोकांनी इस्रोच्या युट्यूब चॅनेल सब्सक्राइब केले आहे.
इस्त्रो
इस्रोच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर आज चांद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण करण्यात आले. अवघ्या एका तासात सुमारे ८० लाख लोकांनी चांद्रयान-३ चे प्रक्षेपण पाहिले, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड ठरला आहे.
कॅसिमिरो
कॅसिमिरो हा एक स्पॅनिश युट्यूबर आहेस, जो खेळांबद्दल विनोदी व्हिडिओ बनवतो. दरम्यान, २६ जून २०२१ रोजी त्यांनी आपल्या चॅनलवर लाईव्ह स्ट्रिमिंग केले होते, त्यावेळी तब्बल ६३ लाख लोकांनी पाहिले होते.
TheGrefg
TheGrefg हा एक स्पॅनिश युट्यूबर आहे, जो गेमिंगशी निगडीत व्हिडिओ बनवतो. त्याने ११ जानेवारी २०२१ रोजी लाईव्ह स्ट्रिमिंग केले होते, त्यावेळी २५ लाख लोकांनी पाहिले होते.
ब्लॅकपिंक
ब्लॅकपिंक हे दक्षिण कोरियन गर्ल ग्रुप चॅनल आहे, जे पॉप गाणी अपलोड करते. दरम्यान, २६ जून २०२० रोजी हाऊ यू लाइक दॅट हे गाणे या चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आले होते. या गाण्याला एकावेळी १९ लाख लोकांनी बघितले होते.
BTS
BTS हे दक्षिण कोरियन बॉय बँड चॅनल देखील आहे. या चॅनेलवर १४ जून २०२० रोजी एका कॉन्सर्टचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते, जे १७ लाख लोकांनी पाहिले होते