(सांगली)
पावसाळा सुरू झाल्यामुळे सांगलीचे चांदोली राष्ट्रीय उद्यान 15 जूनपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. हे उद्यान 15 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे उद्यान परिसरात पर्यटकांनी येऊ नये, असे आवाहन चांदोली राष्ट्रीय उद्यान कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे हा निर्णय दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला आहे. सध्या तिथं मान्सनपूर्व पाऊस सुरु असल्यामुळे धरण प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या परिरात घनदाट जंगल असल्यामुळे अनेकदा प्राणी पाहायला मिळत असल्यामुळे पर्यटकांची अधिक गर्दी असते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस असणार्या आणि पर्यटकांचे माहेरघर म्हणून चांदोली अभयारण्य आणि धरण परिसर समजला जातो.
गेल्या 5 महिन्यांत पाच हजार पर्यटकांनी या उद्यानास भेट देऊन येथील निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद लुटल्याची नोंद झाली. पावसाळा सुरू झाला की, दरवर्षी 15 जूनपासून हे उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते. या कालावधीत नैसर्गिक आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरु झाला की येथील पर्यटन बंद करण्यात येते. पावसाळा संपल्यानंतर 15 ऑक्टोबरपासून उद्यान पुन्हा पर्यटनासाठी खुले होईल.