( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील चांदेराई हरचेरी येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल कण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद हाजिरा फिरोज शेख (43, दारुल मज्जीद इब्रहीम पठ्ठण चांदेराई, हरचेरी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली मुलगी 17 वर्षे 3 महिन्यांची असून कोणतरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून घरातून पळवून नेले आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादविकलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.