(मुंबई)
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चहा पावडरच्या पाऊचमध्ये कोट्यवधी रुपयांच्या हिऱ्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न फसला. कस्टम विभागाने आरोपीला अटक केली असून मुकीम रजा अश्रफ मन्सुरी असे आरोपीचे नाव आहे. तो मुंबई विमानतळाहून दुबईला जात होता. या चहा पावडरच्या पाऊचमध्ये दीड कोटींचे हिरे होते.
सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याला अडवले. त्याच्या हातात असलेल्या सामानाची तपासणी केली असता, त्यामध्ये एक चहा पावडरचे पाकीट सापडले. ते जप्त करून त्याची तपासणी केली असता त्यात आठ छोट्या पाऊचेसमध्ये ३४ हिरे सापडले. हिऱ्यांचे वजन १५५९.६८ कॅरेट्स इतके भरले. ज्याची किंमत १.४९ कोटी रुपये इतकी होती. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
मुंबईतील नळ बाजार परिसरात राहणारा मुकीम रझा अश्रफ मन्सूरी (30) हा मुंबईहून दुबईला जात होता. कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मन्सूरीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखले. तपासादरम्यान मन्सूरीच्या बॅगमधून प्रसिद्ध चहा ब्रँडची पिशवी जप्त करण्यात आली. या पाऊचची तपासणी केली असता यातील आठ पाऊचमध्ये 34 हिरे आढळले. हिरे तस्करीसाठी पाच हजार रुपये मिळणार होते, असेे आरोपीने सांगितले. सध्या मुकीमची कस्टम विभागाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.