(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहानिमित्त व क्रांतीभूमीला वंदन करण्यासाठी भीम युवा पँथर या संघटनेच्या माध्यमातून रत्नागिरी येथून विशाल महारॅलीचे आयोजन केले आहे. आज सोमवारी (दि. २० मार्च) सकाळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विशाल महारॅलीला सुरुवात करण्यात आली.
सत्याग्रहाच्या वर्धापनदिनानिमित्त यंदा प्रथमच सरकारकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र मानवंदना दिली जाणार आहे. अस्पृश्यतेचे जोखड तोडून टाकण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ ला चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून सत्याग्रह केला होता. इतिहासामध्ये सत्याग्रहाची विशेष महत्त्व असून दरवर्षी महाडमध्ये वर्धापन दिन साजरा केला जातो. याकरिता राज्य व देशभरातून भीमसैनिक क्रांती भूमीला वंदन करण्यासाठी येत असतात. रत्नागिरीमधून तब्बल ६० ते ७० गाड्यांचा ताफा चवदार तळ्याच्या क्रांती भूमीत दाखल होणार आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्या भीमसैनिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी भीम युवा पँथर संघटनेकडून व्यवस्था करण्यात आली आहे.
पार्किंगची सुविधा
महाड शहर तसेच मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पार्किंग व्यवस्था