(रत्नागिरी)
शहराजवळ असणाऱ्या उद्यमनगर-चंपक मैदान येथे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोन तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील रोनित पांडुरंग जाधव (वय २७, रा. गणेशवाडी, ता. वडगाव, जि. सातारा, सध्या रा. डीमार्टसमोर, रत्नागिरी) व हरिश सुरेश वाघमारे (२६, रा. गंगोती, ता. मान, जि. सातारा) अशी संशयित तरुणांची नावे आहेत.
सदर घटना मंगळवारी (ता. ५) रात्री पावणेबाराच्या सुमारास उद्यमनगर-चंपक मैदान येथे निदर्शनास आली. संशयित तरुण चंपक मैदान येथे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना आढळून आला. या प्रकरणी पोलिस हवालदार विनोद भितळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत