(खेड / भरत निकम)
तालुक्यातील घेरारसाळगड-भराडेवाडी येथील मालू गोरे यांच्या मालकीच्या जनावरांसह शेळ्यांवर झालेल्या हल्ल्यात जनावरे व शेळ्या जखमी झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा बावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात बिबट्याकडून पाळीवर जनावरांवर होणारे हल्ले वाढले आहेत.
तसेच ग्रामस्थांकडून मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्यास पळवून लावण्याचा प्रयत्न ग्रामस्थांकडून केला जात आहे. मात्र मानवी वस्तीतही बिबट्याचा वावर सुरू असल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. त्यामुळे वनखात्याने याची गंभीर दखल घेवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे