(रत्नागिरी)
तालुक्यातील वेतोशी धनगरवाडी येथे घराच्या समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविल्याने याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना शनिवारी (ता. २९) ते रविवारी सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी आपली दुचाकी (क्र. एमएच ०७ एए ०२५०) ही योगेश शशिकांत तोडवलकर (रा. डोबिवली-मुंबई) यांच्या नावावर असलेली दुचाकी त्यांच्या घराच्या समोर पार्क करुन ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी फिर्यादी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.