(वास्तु)
घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी लोक घरात विविध प्रकारच्या वस्तू आणतात. अनेकवेळा असे घडते की घरात ठेवलेल्या काही गोष्टी नकारात्मकता पसरवतात. त्यामुळे जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वास्तूनुसार घराची सजावट करताना छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. घर सजवण्यासाठी कोणत्या वास्तू टिप्स आवश्यक आहेत व कोणत्या वस्तूंपासून दूर राहायला पाहिजे ते जाणून घेऊया.
घराशेजारी हिरवी झाडे लावा
घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी बहुतेक लोक हिरवीगार झाडे लावतात जी सुंदर दिसतात. वास्तूनुसार घरामध्ये छोटी रोपे लावण्यासाठी दक्षिण-पूर्व दिशा असणे चांगले मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होत नाही.
दिवसातून एकदा कापूर जाळावा
वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून 1-2 वेळा घरात कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरवा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सुख-समृद्धी राहते.
तुळशीचे रोप पूर्व दिशेला आणि देवाकडे लावा
हिंदू धर्मात तुळशीला खूप चांगले मानले जाते आणि असे म्हटले जाते की तुळशीचे रोप पूर्व दिशेला किंवा मंदिराच्या दिशेने लावणे खूप शुभ असते. यासोबतच गुरुवारी असल्यास थोडेसे कच्चे दूध पाण्यात मिसळून तुळशीला अर्पण करावे. असे केल्याने घरात वाद होत नाहीत आणि घरात शांतता राहते.
हौलमध्ये संतांचे फोटो लावा
घरातील हौलमध्ये संत-महात्मांचा फोटो नेहमी लावावा. असे केल्याने आपल्याला आशीर्वादही मिळतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. घरातील सदस्यांमध्ये एकता असते. प्रगतीचे मार्ग सर्वांसाठी खुले होतात.
फर्निचरला धारदार बनवू नका
वास्तूनुसार, ज्या घरात काठावरुन टोक बाहेर आले असेल त्या घरात असे फर्निचर कधीही ठेवू नये. कारण ते अशांतता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहेत. या कारणास्तव, गोलाकार कडा असलेले फर्निचर नेहमी घरात ठेवावे. घरात जास्त सामान ठेवणे देखील टाळावे.
घरात तुटलेल्या वस्तू ठेवू नका
तुटलेली वस्तू, काच किंवा सुकलेली फुले घरात ठेवू नयेत. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात कलह आणि अशांतता निर्माण होते. तुटक्या फुटक्या वस्तू: तुटके फुटके भांडी, काच, आरसा, इलेक्ट्रिक सामान, फोटो, फर्निचर, पलंग, घडी, दिवा, कुंचा, कप व इतर असे कोणतेही सामान घरात ठेवणे उचित नाही. याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास झेलावा लागतो.
‘असे’ फोटो घरात ठेवू नये
महाभारताच्या युद्धातील चित्र, नटराजची मूर्ती, ताजमहालाचे चित्र, बुडत असलेली नाव किंवा जहाज, फवारे, जंगली जनावरांचे चित्र, काटेदार झाडांचे चित्र घरात लावू नये. याने मनावर वाईट परिणाम होते आणि सतत या फोटोंना पाहिल्यामुळे नकारात्मक भाव विकसित होतात. ज्याने जीवनात चांगल्या गोष्टी घडणे बंद होऊन जातं. असे म्हणतात की महाभारताच्या चित्रामुळे घरात क्लेश वाढतो. नटराजची मूर्ती घरात ठेवणे त्रासदायक होते. ताजमहाल एक कबर आहे त्यामुळे याने मानसिकता नकारात्मक होते. बुडत असलेल्या जहाजाचे चित्र आपले सौभाग्य बुडवू शकते, घरातील संबंध बिघडतात.
बंद घड्याळ
वास्तूशास्त्रानुसार घड्याळांची स्थिती आपल्या कुटुंबाच्या उन्नतीचे प्रतीक असते. घरातील घड्याळ बंद असेल तर प्रगती खुंटते. त्यामुळे घरात बंद पडलेली घड्याळे असल्यास लगेचच दुरुस्त करून घ्या किंवा फेकून द्या
कोळ्याचे जाळे
घरात किंवा अडगळीच्या खोलीत कोळ्याचे जाळे असणे अशुभ मानले जाते. यामुळे दारिद्र येते व घरात आळस, चिडचिडेपणा वाढतो.
पाण्याचा स्रोत येथे असावा
वास्तुशास्त्रानुसार घरातील जिन्याखाली कोणतेही बांधकाम करू नये किंवा तिथे कोणतीही वस्तू ठेवू नये. तसेच घरातील पाण्याचे स्त्रोत हे नेहमी उत्तर दिशेला असावेत.असे केल्याने घरात सुख आणि शांती कायम राहते तसेच कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम कायम राहते.
‘या’ खाली चुकूनही झोपू नका
घराच्या आढ्याखाली, खांबाखाली किंवा खिडकीच्या चौकटीखाली झोपू नये. याचबरोबर हेही लक्षात ठेवावे की घराच्या मध्यभागी अवजड फर्निचर किंवा इतर कोणतीही जड वस्तू ठेवू नये. तसे काही ठेवले असल्यास लगेचच काढा. कारण घरातील मध्यस्थान हे ब्रह्मस्थान मानले जाते म्हणूनच हे स्थान नेहमी रिक्त असले पाहिजे. ब्रह्मस्थानी भारी वस्तू ठेवल्याने मानसिक ताण येऊ शकतो तसेच आर्थिक त्रासही सहन करावा लागू शकतो.
घरातील या ठिकाणी लावू नये आरसा
घरातील भिंतींवर आरसा लावताना तो खूप वर किंवा खूप खाली नाही ना याची खात्री करुन घ्या. असे न केल्यास घरातील सदस्यांना डोकेदुखीचा त्रास उद्धभवतो. तसेच जर आपल्या बेडरूममध्ये पलंगासमोर आरसा लावलेला असेल तर तो त्वरित काढा अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच तुमच्या आयुष्यात काही समस्या कायमस्वरूपी राहू शकतात.
‘या’ दिशेला ठेवू नयेत अवजड वस्तू
घरातील देव्हारा नेहमी पूर्व-उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेस असावा. त्याचबरोबर घरातील सर्व अवजड वस्तू जसे की विद्युत उपकरणे, फर्निचर,कपाट इत्यादी गोष्टी घराच्या दक्षिण भागात ठेवाव्यात.असे केल्यास आपल्याला मानसिक शांती प्राप्त होईल आणि आपल्या कामातील अडथळे देखील दूर होतील.
घरात असू नयेत ‘अशी’ चित्रे
घरात कधीही रक्तरंजित चित्रे, युद्धाची चित्रे, संहारक देवी देवतांची चित्रे, रक्तपाताची चित्रे, हिंस्र पशु-पक्षी यांची छायाचित्रे ठेवू नयेत. अशी चित्रे लावल्यास घरात आणि कुटुंबात भांडणे निर्माण होतात आणि परस्परांतील प्रेमही संपुष्टात येते.त्यामुळे घरात कायम शांतभाव आणि आनंदी मुद्रा असणारी स्थिर चित्रे ठेवावीत. यामुळे घरात आनंद आणि सुख-शांती नांदते.
या रंगांचा घरात वापर करणे टाळा
घराच्या भिंती कधीही लाल रंगाच्या नसाव्यात. निळा,पिवळा यांसारख्या हलक्या रंगाने घराच्या भिंती रंगवाव्यात. तसेच हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे की सिंक आणि गॅस-सिलेंडर्स कधीही स्वयंपाकघरात एकाच दिशेला असू नयेत.अन्यथा घरात पैश्यांशी संबंधित समस्या उद्भवतात.