(ज्ञान भांडार)
पृथ्वी व्यतिरिक्त इतर कोणत्याही ग्रहावर जीवन नाही. याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आहे. इतर ग्रहावर ऑक्सिजनच नाही किंवा अत्यंत कमी प्रमाणात आणि गोठलेल्या स्थितीत आहे. पृथ्वीवरील वृक्ष, वनस्पती हे ऑक्सिजनचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत. यांच्याशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नव्हते. त्यामुळेच आपल्या पौराणिक ग्रंथात वृक्षांना फार महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची पुजा केल्याने आयुष्य सुख-समाधानाने जगता येते, अशी आस्था आहे. ज्योतिष ग्रंथांमध्येही वृक्षांना महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. म्हणून काही ठराविक वृक्षांची पुजा केल्यास आपल्याला जीवनात येणाऱ्या अडचणी कमी होतात असे मानले गेले आहे.
तुळस
धार्मिक मान्यतानुसार ज्या घरात रोज तुळशीच्या झाडाची पुजा केली जाते, त्यांना पाणी दिले जाते. त्या घरात कधीही पैशांची चणचण भासत नाही. अशा घरात देवी लक्ष्मीचा वास असतो.
पिंपळ
शास्त्रीयदृष्टया पिंपळाच्या झाडाची पुजा करणे फार महत्त्वपूर्ण आहे. अशी मान्यता आहे की, पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णुचा निवास असतो. या झाडाची पुजा केल्यास शनि दोषापासूनही मुक्ती मिळते.
बेल
भगवान शंकराच्या पुजेमध्ये बेलाची पाने अनिवार्य मानली गेली आहेत. देवाला ही पाने अत्यंत प्रिय असतात. बेलाच्या झाडाची पुजा केल्यास नोकरीमध्ये प्रमोशन आणि अकाली मृत्यूपासून सुरक्षा मिळते.
अशोक
अशोकाचे झाड प्रत्येक रोग आणि दु:खाचा नाश करते. एखादी विशेष इच्छा असेल तर या झाडाची पुजा फार फलदायी आहे.
केळी
कुंडलीमध्ये गुरु ग्रहाची स्थिती बरोबर नसेल किंवा यामुळे पिडीत असाल तर केळीच्या झाडाची पुजा केली जाते. याचा विशेष लाभ म्हणजे या झाडाची पुजा केल्याने विवाहामध्ये येणा-या अडचणी दुर होतात.
वड
वडाचे झाड त्याला येणा-या पारंब्यामुळे इतर झाडांपेक्षा खास दिसते. सौभाग्याचे रक्षण आणि दीर्घ आयुष्याकरीता महिला या झाडाची विशेष पुजा करतात.
आवळा
आवळा हे अतिशय गुणकारी औषधी झाड म्हणून ओळखले जाते. आवळ्याच्या सेवनाने अनेक रोग नाहीसे होतात. या झाडाची पुजा केल्याने अनेक समस्या दुर होतात आणि लक्ष्मीही नेहमी प्रसन्न राहते. या झाडाची पुजा करणा-यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते, अशी मान्यता आहे.
शमी
शमीच्या झाडाची पुजा केल्याने दीर्घ काळ चालणा-या कोर्ट केसेसमध्ये यश मिळते आणि शत्रुचा नाश होतो.
लाल चंदन
कुंडलीमध्ये सुर्य ग्रहाचा दोष असेल तर लाल चंदनाच्या झाडाची पुजा केली पाहिजे. मात्र सर्व पुजा कार्य हे विधिनुसार संपन्न झाले पाहिजेत. असे केल्याने प्रमोशनचाही लाभ मिळू शकतो.