विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली.
Today I was brutally attacked at Kasbe Dhawanda Village Kalamnuri. An unknown person attacked me from behind .It was a serious attempt to injure me and there is a threat to my life . An attack on lady MLC is an attack on Democracy. Fight from front dont be a coward.
— MLC Dr.Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) February 8, 2023
आम. डॉ. प्रज्ञा सातव यांनी म्हटले की, माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर जखमी करण्याचा हा हल्लेखोराचा प्रयत्न होता. या घटनेमुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. एका महिला आमदारांवर झालेला हा हल्ला लोकशाहीवरील हल्ला आहे. हल्लेखोराने अंगरक्षक बाजूला असताना पाठीमागून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.
प्रज्ञा सातव यांनी हल्लेखोरांना इशारा दिला आहे की, माझ्याशी समोरून लढा असे भ्याड हल्ले करू नका. या घटनेची माहिती पोलिसांना दिली असल्याचं प्रज्ञा सातव यांनी म्हटलं आहे.