(रत्नागिरी)
मौजे टेंभ्ये गावातील ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबई या संस्थेच्यावतीने रविवार दि. १५ जानेवारी रोजी श्री भैरी जुगाई गाव पॅनलमधून निवडून आलेले नवनिर्वाचीत टेंभ्ये गावचे सरपंच श्री अशोक श्री नागवेकर, उपसरपंच श्री संतोष रा साळवी व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच भैरी जुगाई देवस्थान चे मानकरी श्री प्रकाश स साळवी यांचा जाहीर नागरी सत्कार समाज मंदिर टेंभ्ये येथे करण्यात आला. या कार्यक्रमला संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश ज साळवी, संस्था सेक्रेटरी श्री विनय द साळवी, खजिनदार श्री विलास भि साळवी तसेच कार्यकारणी सदस्य सर्व श्री. अनिल य साळवी, श्री विजय बा साळवी, श्री संतोष शा साळवी, श्री रुपेश र साळवी, श्री रुपेश रा साळवी भैरी जुगाई देवस्थानचे मानकरी श्री प्रकाश स साळवी, माजी सरपंच श्री संदीप सु साळवी, ग्रामस्थ श्री. सुदेश वि साळवी, श्री प्रमोद बा साळवी, श्री सुनिल य साळवी, श्री अरविंद रा साळवी, श्री संतोष धो साळवी, श्री संदेश धो साळवी, श्री अमोल सु साळवी, श्री विलास श्री साळवी, श्री रमेश म साळवी, श्री आग्रे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस श्री अशोक श्री नागवेकर सरपंच यांचा सत्कार श्री सुरेश ज साळवी यांनी व श्री संतोष रा साळवी उपसरपंच यांचा सत्कार श्री विनय द साळवी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला. नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले व यापुढे गावाचा विकास करताना सर्व घटकांचा विचार करुनच केला जाईल. यासाठी नियोजन करण्यात येवून विकास करण्यात येईल याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये मौजे टेंभ्ये गावातील ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबई या संस्थेचे श्री. सुरेश ज साळवी यांनी गावच्या पुढील विकासासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला टेंभ्ये गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विनय द साळवी यांनी केले.