व्यावसायिक LPG सिलिंडरच्या (19 किलो) किमती आज कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 36 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबा आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना 19 किलोचा सिलेंडर 36 रुपयांनी स्वस्त होण्याचा मुख्य फायदा मिळणार आहे.
दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांनी कपात केल्यानंतर आता 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे, जो पूर्वी 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता.
दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांची कपात केल्यानंतर ती 1976.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2012.50 रुपये होती.
14.2 किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर 6 जुलैच्या दराने उपलब्ध आहे आणि त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.