(रत्नागिरी)
आपणही आपल्या समाजाचे काही देणे लागतो, अशा विचारसरणी असणाऱ्या बऱ्याच व्यक्ती आपल्या आजूबाजूला सहज दिसून येतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे वरवडे विकास महामंडळ उपाध्यक्ष तथा संपर्क युनिक फाऊंडेशन, रत्नागिरी सदस्य आणि नुकतीच कोहिनूर व्हॅली व्ह्यू गृहनिर्माण संस्थेच्या (नाचणे) सेक्रेटरी म्हणून ज्यांची एकमताने निवड झाली त्या वृंदाताई बोरकर.
विशेषतः रत्नागिरी ग्रामीण तालुक्यातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसच्या समस्या असो किंवा ग्रामीण विभागातून शहरात येणाऱ्या लोकांच्या आरोग्य समस्या असो त्यांचे काही अंशी निवारण करण्याचे काम सध्या वृंदाताई नित्यनेमाने करीत आहेत. स्थानिक बचत गट मार्फत अनेक महिलांच्या घरगुती व सामाजिक समस्या सोडविण्याचे कामही त्या मनोभावे करीत आहेत. आपल्या बचत गटाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून इतर बचत गटातील महिलांना देखील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या योग्य मार्गदर्शन करण्याचे काम त्या आपलेपणाने करीत आहेत. पुढे जाऊन सुद्धा ग्रामीण विभागातील महिला व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचा त्यांचा संकल्प आहे. येत्या 3 फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या हातून समाजसेवेचे हे कार्य अविरत चालू राहावे यासाठी त्यांना जनसामान्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.